
मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
यावल | तालुक्यातील सावखेडा सिम येथील शिवारात ३५ वर्षीय तरूणावर सातपुडा जंगलातील निमळाव रस्त्यावर मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवारी घडली.
तालुक्यातील दहिगाव गावापासुन जवळच असलेल्या सावखेडासिम शिवारात सावखेडासिम येथील राहणाऱ्या संदीप हरी बर्डे (वय-३५) या तरुण सातपुड्याच्या जंगलातील निमळाव रस्त्यावर आपल्या शेतात कामास जात असताना अचानक आगे मोहोळा वरील मधमाशांनी हल्ला चढवून शरीरावर विविध ठीकाणी चावा घेत त्यास जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. संदीप बर्डे याला जखमीवस्थेत सावखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास घरी परत पाठवले आहे.
Live Cricket
Live Share Market