शिवसेना नगरसेवकांनी दिले भाजपच्या महापौरांना सन्मानपत्र; उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव

जळगाव प्रतिनिधी | महापालिकेची काल महासभा आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी विरोधी पक्षात असणाऱ्या शिवसेना नगरसेवकांनी ढोल-ताशांच्या गजरात महापौरांचा सत्कार केला. आपण विरोधात असूनही महापौरांचे स्वागत करत असल्याचे शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी याप्रसंगी सांगितले. महासभेआधी महापालिकेत ढोल-ताशांचा दणदणात झाला.

 

सभा सुरू होण्याआधी शिवसेनेतर्फे महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार केला. यानंतर सभागृहात महापौर आणि त्यांचे पती पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौरांना सन्मानपत्र देखील प्रदान करण्यात आले. यात भारतीताई सोनवणे यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर शहरातील अनेक महत्वाचे प्रश्‍न मार्गी लावण्यात आले असून विशेष करून कोवीड काळातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचा नमूद करण्यात आले आहे. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी या सन्मानपत्राचे वाचन केले.

सन्मानपत्र देताना शिवसेना नगरसेवक गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, नितीन बरडे, नितीन लढ्ढा, अनंत जोशी.

याप्रसंगी सभागृहात आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर सुनील खडके आदींसह नगरसेवकांची उपस्थिती होती.

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close