
‘बिग बी’ यांची प्रकृती खालावली स्वत: पोस्ट करत दिली माहिती
मुंबई | बाॅलिवूडमध्ये बिग बी या नावाने संपुर्ण देशात प्रसिद्ध असणारे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तरुणपणापासून लोकांच्या मनावर अभिराज्य गाजवत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही अमिताभ यांनी सोशल मीडियाचा आधार घेत मनोरंजनाचं कार्य अविरत सुरू ठेवलं. ते अनेकदा आपल्या सोशल मीडियावरुन त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कामाचे आणि त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणांची माहिती देत असतात. एवढचं नाहीतर सोशल मीडियवर फोटो शेअर करताना त्या फोटोला कॅप्शन म्हणून त्यांच्या चाहत्यांसाठी कविता देखील बनवून टाकत असतात.
ट्विटर, इंस्टाग्राम अशा काही सोशल अॅप्सवर अमिताभ यांचं अकाऊंट असून tumblr.com या वेबसाईटवर देखील त्यांचं ऑफिशिअल अकाऊंट आहे. तिथं ते गेले 4747 दिवसांपासून रोज ब्लाॅग शेअर करतात. यादरम्यान त्यांच्या नुकत्याच शेअर केलेल्या ब्लाॅग मध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मेडिकल कंडिशन, शस्त्रक्रिया चालू आहे, जास्त लिहू नाही शकत, अशा शब्दात त्यांनी एक ब्लाॅग शेअर केला आहे. या कारणामुळे त्यांचे चाहते चिंतेत आले असून अनेक जनांनी कमेंट्समध्ये त्यांना स्ट्रेस न घेता काळजी घेण्यास सांगितलं आहे. तसेच त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ ह्या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात बच्चन क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकरणार आहेत. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होण्याची महिती स्वतः बच्चन यांनी दिली होती. एवढचं नाही तर या चित्रपटाचं पोस्टर देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.