“हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी भावेश ढाके | महामार्ग पोलीस केंद्र पाळधी जिल्हा-जळगाव येथे मा. अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. भुषणकुमार उपाध्याय सो यांचे संकल्पनेतुन “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास उपस्थिती नायब तहसीलदार-धरणगाव श्री.लक्ष्मण सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. देशमुख ARTO उपप्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव, पोलीस निरीक्षक श्री.देवदास कुनगर शहर वाहतूक शाखा जळगाव, सपोनि.श्रीगणेश बुआ पाळधी पोलीस दुरक्षेत्र, डॉ. श्री. जितेंद्र जैन, जळगाव, श्री.बालाजी लोंढे तलाठी पाळधी सजा, श्री.फिरोज शेख -मौलाना आझाद संस्था जळगाव, तसेच स्थानिक नागरीक आणि महामार्ग पोलीस केंद्र पाळधी कडील अंमलदार उपस्थित होते.

हायवे मृत्युंजय दूत या योजनेबाबत उपस्थित मान्यवरांना प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी श्री सुनील मेढे यांनी योजना कशी राबविण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती दिली तसेच सदरची योजना चांगल्या प्रकारे राबविण्याकरीता मदत आणि सहकार्य करण्याचे जनतेला महामार्ग पोलीस केंद्र पाळधी तर्फे आवाहन केले आहे.

कार्यक्रम आयोजन करण्यासाठी API सुनिल मेढे, NPC हेमंत महाडीक, प्रदिप नंनवरे, पंकज बडगुजर दिपक पाटील यांनी मेहनत घेतली, व

कार्यक्रम सूत्रसंचालन PC वसिम मलिक यांनी केले

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close