केंद्रीय कृषिमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांचे जळगाव विमानतळावर आगमन

जळगाव प्रतिनिधी (भावेश ढाके) । केंद्रीय कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, सामाजिक न्यायमंत्री थेवरचंद गेहलोत तसेच खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आदी मान्यवरांचे शहापूर बऱ्हाणपूरसाठी जाण्यासाठी जळगाव विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी जिल्ह्यातील शासकीय कामांचा व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.

 

ग्रामीण व कृषि मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्येबाबत केले अवगत – खासदार रक्षा खडसे

नंदू भैय्या यांच्या पार्थिवावर अंतिम संस्करण हेतू बुऱ्हाणपूर येथे जाण्यापूर्वी जळगाव विमानतळ येथे पार्थिवाचे सोबत आलेल्या कृषी व शेतकरी मंत्री तथा ग्रामीण विकास व पंचायती राजमंत्री श्री नरेंद्र तोमर, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री श्री थावरचंद गहलोत, तसेच स्टील राज्यमंत्री श्री फगनसिंग कुलुस्ते आणि श्री ज्योतिरादित्य सिंधिया, खासदार ग्वालियर यांच्याकडे खासदार रक्षाताई खडसे याच्या नेतृत्त्वात स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत ग्रामीण व कृषी मंत्र्यांना अवगत करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या समक्ष कृषी मंत्र्यांकडे मांडल्या.

शेतकऱ्यांच्या समस्येबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ग्रामीण व कृषी मंत्र्यांनी दिले.

या वेळी खा. रक्षा खडसे, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, उपमहापौर सुनील खडके, महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजप महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी आदींनी भेट घेतली. या भेटीत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी जिल्ह्यात किती मतदार संघ आहेत. कोणत्या पक्षाचे किती खासदार, आमदार आहेत. शासकीय व पक्षाच्या कामाबाबत तसेच राजकीय बलाबल कसे आहे ? याबाबतही सविस्तर चर्चा केली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close