शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘जलगांव’ चे जळगाव करण्याची मागणी

▫माय मराठी फाऊंडेशनने केली मागणी

जळगाव | महाराष्ट्रात शासकीय कामाकाजात तसेच शासनाच्या कार्यालय तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये १००% मराठीचा वापर करण्याचा नियम असून तो नियम जळगाव मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनाही लागू असून या नियमास हरताळ फासल्याचे माय मराठी फाऊंडेशन मुंबई येथील या संस्थेचे अध्यक्ष मंगेश मिस्कीन यांनी व्यक्त केले आहे, या रूग्णालयाच्या प्रवेश द्वाराच्या कमानिवरील नावा मध्ये जळगाव ऐवजी ‘जलगाव’ असा हिंदी भाषेत उल्लेख आहे. या विषयी तक्रार माय मराठी फाऊंडेशन,मुंबई चे संस्थापक अध्यक्ष मंगेश मिस्कीन यांनी ट्विटर तसेच ‘आपले सरकार पोर्टल वर दिनांक २५-०२-२०२१ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार केली असुन, तक्रार संबंधित प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती उत्तरात जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. लवकरच यात बदल व्हावा अशी अपेक्षा माय मराठी फाऊंडेशनने व्यक्त केली आहे.

 

आम्ही या सुचनेची दखल घेतली असून नविन बोर्ड बनून तयार आहे. लवकरच कमानीवरील नावात दोन-तीन दिवसात बदल केला जाईल
– डॉ. जयप्रकाश रामानंद
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close