
जळगाव शहरातील आशादीप निराधार महिला वसतिगृहातील घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संताप व्यक्त केला
मुंबई,
सुनील कुमार ठाकूर
मुंबई —जळगाव शहरातील आशादीप निराधार महिला वसतिगृहातील घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संताप व्यक्त केला आहे.
महिला तक्रार घेऊन आली की ती दाखल करा नंतर चौकशी करण्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स ह्या महाराष्ट्र पोलिसांना लागू नाहीयेत का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली
शहरातील आशादीप वसतिगृहातील मुलींना नग्न करून नृत्य करायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. दरम्यान गृहमंत्र्यांनी यासाठी चौकशी समिती नेमली आहे. तर स्थानिक स्तरावरही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली असून चौकशीला सुरवात करण्यात आली आहे. चौकशीसंदर्भात सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी माहिती दिली.