गजानन मालपुरे यांना शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख करा; शिवसैनिकांची मागणी

जळगाव |  जळगाव महापालिकेत नुुुुुुकतेच सत्तांतर घडून आले आहे. महापौर आणि उपमहापौर हा शिवसेनेचा झाला. जळगाव महापालिकेतील भाजपाची सत्ता उलथवून शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात मोलाचा वाटा असणारे जळगाव शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्या जळगाव जिल्हाप्रमुख करण्याच्या मागणीसाठी सोशल मीडियावर शिवसैनिकांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशात असे म्हटले आहे:-

” गजानन मालपुरे यांना मनपात नगरसेवक किंवा शिवसेना जिल्हाप्रमुख करावे ही मा. उद्धव साहेबांना शिवसैनिकांची मागणी”

असा संदेश सोशल मीडियावर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी टाकलेले आहेत.

गजानन मालपुरे हे जळगाव शिवसेनेचा जूना चेहरा व जळगाव शहराला परिचीत असणारे व एकनिष्ठ शिवसैनिक व जळगावातील अनेक मुलभुत सुविधांसाठी त्यांचे आंदोलने व त्यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेले कामे हेच त्यांचे बोलके चित्र आहे जळगाव जिल्हाभरात त्यामुळे त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदी वर्णी लावायला हवी अश्या प्रकारच्या प्रतीक्रियेतून सोशल मिडीयावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठीची मागणी जोर धरत आहे.

आता सद्या शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे आहेत. यांचा कार्यकाल ही पुर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नविन जिल्हाप्रमुखाची निवड करून त्यांनाही कामाची संधी द्यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close