तंबाखूमुक्त नियंत्रण सर्व्हेत महानगरपालिकेची मिटमिटा शाळा मराठवाड्यात अव्वल

आकाश ठाकूर—/

९२२५९९९९०९

 

 

तंबाखूमुक्त नियंत्रण सर्व्हेत महानगरपालिकेची मिटमिटा शाळा मराठवाड्यात अव्वल …!

 

 

औरंगाबाद : भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय अंतर्गत सलाम फाऊंडेशनच्या तंबाखूमुक्त नियंत्रण सर्व्हेत औरंगाबाद शहरातील मिटमिटा मनपा शाळा मराठवाड्यातून अव्वल ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

पडेगाव, मिटमिटा येथील मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा यांनी भारत सरकार, आरोग्य मंत्रालय अंतर्गत तंबाखूमूक्त नियंत्रण शाळा अभियान मार्गदर्शक सूचनानूसार उपक्रम राबविले. यात विद्यार्थी, पालक, समाज, परीसर आदिंचा सहभाग घेवून विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

हा उपक्रम राबविण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व भारत सरकार आरोग्य मंत्रालय, मनपा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील विविध शाळा महाविद्यालयांमधून प्रभावीपणे नऊ निकष ठरवून पोस्टर स्पर्धा, गावकरी, पालक, विद्यार्थी यांचे प्रबोधन करुन तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आला.

हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी सलाम मुंबई फाउंडेशन व मिटमिटा मनपा शाळेने स्वीकारली होती. यात मनपा शाळाने हे निकष पूर्ण करुन १०० पैकी १०० अंक घेवून मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळवला असून तंबाखू नियंत्रणात टोबॅको फ्री स्कूल म्हणून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

शाळेच्या मूख्याध्यापिका आर.सी.हिवाळे, शिक्षक देवरे, पंडीत, तडवी, जाधव व औरंगाबाद येथिल मुंबई सलाम फाऊंडेशनचे समनव्यक संदिप वाहूळ यांनी परीश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, मिटमिटा शालेय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बनकर, एड. अशोक मूळे, पत्रकार शिवाजी गायकवाड आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close