चोपडा तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाची आढावा बैठक संपन्न

 

 

जळगाव (प्रतिनिधी भावेश ढाके) | महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव हा सातत्याने वाढत आहे. त्यासंदर्भात खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत कोरोना संसर्गाची आढावा बैठक संपन्न झाली. 

 

कारोना संसर्गाने जनसामान्यांची तारांबळ उडाली आहे. यात चोपडा तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता रुग्णांना भेडसावत आहे. त्यासंदर्भात खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले. यासोबतच खाजगी रुग्णालयाकडून विविध चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. प्रामुख्याने लसीकरणाचा व सिटीस्कॅन तपासणीचे शुल्क फलकावर असणे अनिवार्य असून यासाठी प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर शुल्क तपशील असलेले फलक लावण्याचे निर्देश खासदारांनी दिले. रुग्णांकडून सिटीस्कॅनचे वाढीव दर घेतले जात होते त्याबाबत खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देण्याचे सूचित केले त्यासह सिटीस्कॅन मशिनही वाढती रुग्णसंख्या पाहता उप जिल्हा रुग्णालय चोपडा येथे अजून मशीन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना लढ्यासाठी इंजेक्शनचा तुटवडा व काळा बाजार होणार नाही यासाठी एका नोडल ऑफिसरची निवड करून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

 

सदर बैठकीला प्रांत अधिकारी चोपडा भाग सुमित शिंदे, प्रांत अधिकारी अमळनेर श्रीमती सीमा अहिरे, सिव्हील सर्जन डॉ.एन.एस. चव्हाण, चोपडा तहसीलदार अनिल गावित आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close