
शिवसेना_नेते_चंद्रकांत_खैरे_जिल्हाधिकारी_सुनील_चव्हाण #यांच्या_उपस्थितीत_भद्रा_मारुती_मंदिर_खुले
आकाश ठाकूर
९२२५९९९९०९
शिवसेना_नेते_चंद्रकांत_खैरे_जिल्हाधिकारी_सुनील_चव्हाण #यांच्या_उपस्थितीत_भद्रा_मारुती_मंदिर_खुले
रत्नपुर : जिल्ह्यातील भाविकांची दैवत असलेल्या श्री भद्रा मारुती मंदिर नियमांचे पालन करून सुरू करण्याची मागणी भक्तांनी केली होती. त्यामुळे भद्रा मारूती मंदीर भाविकांसाठी आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत महापुजा करून उघडण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत लॉकडाऊन केला नाही.
परंतु यापुढे नियम व अटी आणि खबरदारी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात अशंत: लॉकडाऊनची घोषणा करून शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी येणाऱ्या भाविकांची गर्दी व संख्या लक्षात घेता मंदीर देवस्थान ने सुरक्षित अंतर त्याचबरोबर दर्शनासाठी नियोजन करून ते लेखी मागितले होते.
यावर देवस्थानने नियोजनाची माहिती सादर केली त्या अनुषंगाने भद्रा मारूती मंदीर मंदीर आज शनिवारपासून भाविकांना कोरोनाच्या सर्व नियम पाळून उघडण्याची परवानगी दिली. येथील रत्नपुर येथील भद्रा मारूती मंदीरात शनिवारी सकाळी दहा वाजता मंदीराचे विश्वस्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, भद्रा मारूती मंदीर देवस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, मंदीर देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्या उपस्थितीत महापुजा, अभिषेक करून मंदीर उघडण्यात आले. प्रशासनाच्या भद्रा मारुती मंदिर व वेरूळ येथील घृष्णेश्वर शिवमंदिर सुरू केल्याने भाविकांनी आभार मानले.