
आमदार स्थानिक विकास निधीतून रमजान बाबा नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ
अब्दुल रहमान मलिक
धुळे -–शहरातील ८० फुटी रोड लगत असलेल्या बाबा नगर येथे आमदार स्थानिक विकास निधीतून रमजान बाबा नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणच्या परीसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती कि या
रस्त्याची खूपच दुर्दशा झालेली आहे या रोडबाबत अनेकांनी मोठी आश्वासने दिली परंतु हे काम आमदार फारूक शाहच करतील असा आम्हाला विश्वास होता म्हणून आम्ही आमदारांकडे काँक्रीटी रस्त्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे दिलेले निवेदनाचा आणि आमच्या रमजान बाबा नगर येथील रहिवाश्यांचा शब्द
राखत जन सामन्यांचे आमदार फारूक शाह यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून बाबा नगर येथे १० लक्ष रुपयांचा रस्ता काँक्रीटीकरण कामाचा आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या कामाच्या उद्घाटना प्रसंगी आमदार फारूक शाह यांच्यासह नगरसेवक सईद बेग, गनी डॉलर, युसुफ मुल्ला, सलिम शेठ शाह, महिला जिल्हाध्यक्ष दीपश्री नाईक, शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा शेख, वसीम अक्रम, आसिफ भोलू शाह, परवेज शाह, आदिंसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.