
नियमांचे उल्लंघन : जळगावात मुख्य बाजारपेठेतील दुकाने सील तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई
- राज्यात आजपासून मिनी लॉकडाऊन लागू
जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने राज्यात लॉकडाऊन न करता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होतांना दिसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश प्राप्त झालेले असल्याने जिल्हा प्रशासन व महापालिकेने कारवाईस सुरूवात केली आहे.
आज जळगाव महापालिकेकडून जळगावातील गर्दीचे ठिकाण असलेली मुख्य बाजारपेठेत अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई केली तर काही दुकाने सील केलेली आहेत. काही विक्रेते विनामास्क मालाची विक्री करताना दिसले त्यांना मनपाच्या पथकाने दंड ठोठावला आहे. यात ६ दुकाने सील करण्यात आली असून तर इतर दुकानांवर तोंडावर मास्क नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई मनपाच्या पथकाने केली आहे.
मनपाच्या पथकाने हि कारवाई सुभाष चौक, चित्रा चौक, फुले मार्केट, गांधी मार्केट व त्या जवळील असलेल्या खाजगी मार्केटात करण्यात आली.