
गैस सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या पाचवर., कुटुंबियांचे पुनर्वसनासाठी शासकीय आर्थिक मदत देण्याची पत्रकार खान नजमुल इस्लाम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सह नाशिक हून
आमीन शेख जकीयोद्दीन
जुने नाशिक —येथील इगतपुरीवाला चाळीमागील संजरीनगर सोसायटीतील फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडर बदलताना गॅस गळती होऊन झालेल्या सिलिंडरचा स्फोटातील मृत्यू संख्या पाचवर गेली आहे.आज मंगळवारी.सकाळी सोहेब वलीऊल्लाह अन्सारी (२८) यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रहीम सय्यद व वलीऊल्लाह अन्सारी कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असुन हातावरचे कमाविणारे असल्याने दुर्घटनेत त्यांनी कर्ते गमावले असल्याने कुटुंबियांना तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची पुनर्वसनासाठी शासकीय आर्थिक मदत देण्याची मागणी पत्रकार खान नजमुल इस्लाम यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे .जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्घटनेची चौकशी व तपासणी अंती पुनर्वसन मदतीचे आश्वासन दिले आहे.
सईदा सुलतान सय्यद, नसरीन नुसरत सय्यद या नणंद भावजयीच्या पाठोपाठ लियाकत रहीम सय्यद नुसरत रहीम सय्यद या सख्ख्या भावांचा स्फोट दुर्घटनेत मृत्यू झाला होता. आणखी दोन सख्खे भावांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मंगळवारी सोहेब वलीऊल्लाह अन्सारी यांचा मृत्यू झाला. गैस सिलिंडर स्फोटातील रमजान वलिऊल्ला अन्सारी मुस्कान वलिऊल्ला अन्सारी या दोघा भाऊ बहिणीवर शर्थीचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
शुकवारी (दि ३) इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट नंबर ७ मध्ये गॅस सिलिंडर बदलत असतानाच गैस गळती होवुन सिलिंडरचा स्फोटाची दुर्घटना घडली होती. सिलिंडर स्फोटात ९० टक्के पेक्षा अधिक भाजलेल्यांची प्रकृती सुरवातीपासून चिंताजनक बनलेली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान या पाचही जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने रहीम सय्यद व वलीऊल्लाह अन्सारी यांच्या कुटुंबियांवर मोठे आघात व दुखा:चे डोंगर कोसळले आहे.