जळगाव महापालिका व पोलीस प्रशासनाकडून हॉकर्स प्रतिनीधींसोबत बैठक

जळगाव प्रतिनिधी | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील गोलाणी मार्केट, सुभाषचौक परिसरासह नजीकच्या मार्केटात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पाहणी करून सद्य स्थितीचा आढावा घेतला.

पाहणी दरम्यान असे आढळून आले की भाजीपाला व फळ विक्रेते शासनाने दिलेल्या नियम भंग करत आहेत. त्या अनुषंगाने आज महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात महापालिका व पोलिस प्रशासनाकडून हॉकर्स धारकांची बैठक बोलवण्यात आली होती.

 

या बैठकीत जळगावातील सर्व हॉकर्स संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत हॉकर्स यांना सुचना देण्यात आल्या, शासनाने दिलेल्या आदेशानुसार शारिरीक अंतर राखणे, सेनिटरायझर, तोंडावर मास्क चा वापर करणे, व पालिकेने नेमुन दिलेल्या जागेवरच आपल्या मालाची विक्री करणे या सुचना हॉकर्ससाठी बंधनकारक असणार आहे. अशा सुचना आयुक्त सतिश कुलकर्णी, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी हॉकर्स संघटनांच्या प्रतिनिधी यांना दिल्या आहेत.

 

नियमांचा भंग केल्यास त्या हॉकर्स धारकांवर कारवाई करण्यात येईल अश्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close