नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती,22 रुग्ण दगावले,जाचअनेक रुग्ण मृत्यु शैय्येवर
नाशिक : राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात
ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 11 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती
थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
गळती रोखण्यासाठी प्रयत्न
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनगळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झालं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळेरुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
30 ते 35 जण दगावल्याचा सुधाकर बडगुजर यांचा दावा.मी स्वत: या रुग्णालयात आत जाऊन सर्व बेड चेक केले. यात 161 रुग्ण हे गंभीर आहेत. तर 30 ते 35 जण दगावल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दीड तासापासून ते ऑक्सिजनसाठी तडफडत होते. पण त्यांना ऑक्सिजन न मिळाल्याने ते मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
ज्या एजन्सी ऑक्सिजन प्लांट बसवला असेल, त्यांनी या ठिकाणी टेक्निकल टीम ठेवणं गरजेचे होतं. ऑक्जिन प्लांट हे डॉक्टर बघत नाहीत. ते टेक्निकल काम असतं. मात्र त्यांनी टेक्निकल टीम या ठिकाणी का ठेवली नाही? असा सवालही सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.