राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग शिष्टमंडळा ने राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची घेतली भेट,मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा देण्या सह विविध मागन्यांचे दिले निवेदन

मुंबई — राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग शिष्टमंडळा ने राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांना मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा देण्या सह विविध मागन्यांचे निवेदन दिले.देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा देण्यात यावा.म्हाडा आणि सिडको मध्ये कलाकारांना पाच टक्के आरक्षित घर मिळायला पाहिजे,सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्ध कलावंत मानधन कमिटी स्थापन करा.महाराष्ट्र शासनाची सांस्कृतिक कमिटी जाहीर कराव्यात यावी.गेली पाच वर्ष मराठी चित्रपटांना अनुदान मिळाले नाहीत तेसुद्धा लवकर मिळावे ,वृद्ध कलावंत पेन्शन मध्ये जास्तीत जास्त वाढ करावी. या सह अनेक विषयांवर सांस्कृतिक मंत्री यांच्या बरोबर चर्चा झाली .सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या आणि लवकरात लवकर पुढील पंधरा दिवसात या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील असा शब्द सांस्कृतिक मंत्री यांनी दिला.यावेळी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील ,अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेत्री सविता मालपेकर ,अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, प्रदेश सचिव मंगेश मोरे ,राज्य समन्वयक संतोष साखरे उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close