डाॅ. शाहीन काझी उच्च माध्यमिक विद्यालयात “ऑनलाईन शिक्षण; शिक्षक व पालकां च्या जबाबदाऱ्या” या विषया वर चर्चा सत्र संपन्न

मोहम्मद फ़जल

जळगाव –-येथील डाॅ.शाहीन काझी उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन शिक्षण: शिक्षक व पालकां च्या जबाबदाऱ्या या विषयावर चर्चासत्रा चे आयोजन प्राचार्य अकील खान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले
आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यानी सध्या च्या स्थितीत ऑनलाईन शिक्षणा ची गरज तसेच महत्त्व व्यक्त करतांनाच पालक व शिक्षक वर्गाचा जबाबदाऱ्या व्यक्त करताना म्हणाले की मोबाईल व ऑनलाईन पद्धती चे शैक्षणिक कार्य दुधारी तलवारी सारखे आहे यावर नजर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे वर्ग शिक्षक मुश्ताक भिस्ती यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की काळानुरूप सामाजिक गरजा पध्दती मध्ये बदल घडत असतो आज शैक्षणिक क्षेत्रात परिस्थिती नुसार मोठे बदल झाले आहे त्या अनुषंगाने शैक्षणिक माहीती विद्यार्थीनी पर्यंत पहोचने गरजेचे आहे शाळा महाविद्यालय बंद आहे तरी विध्यर्थीनी कडून कार्य करून घेणे गरजेच आहे तन्वीर जहा शेख, रिजवाना सैय्यद व आस्मा शेख यांनी ही विचार व्यक्त केले.
बारावी बोर्डाची परिक्षा, दहावी नंतर चे उच्च शैक्षणिक कोर्सेस ची माहिती, विध्यर्थीनी ची संभाव्य समस्या इत्यादी विषयांवर ही चर्चा करण्यात आली तद्नंतर शिक्षक पालक विध्यर्थीनी यांचा चर्चा सत्र संपन्न झाले सूत्रसंचालन मुश्ताक भिस्ती यांनी तर आभार आस्मा शेख यानी व्यक्त केले नाजिया शेख यांच्या सहकार्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close