महाराष्ट्र उर्दू टीचर्स युनियन तर्फे शिक्षक दिनानिमित्त सत्कार मुर्तीचा सत्कार सोहळा संपन्न

जळगाव — 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक, राजनैतिक, संस्थान कडून गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार महाराष्ट्र उर्दू टीचर्स युनियन जळगाव जिल्हा शाखे तर्फे संपन्न झाला. कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अस्लम शेख तर विशेष अतिथी म्हणून प्राचार्य अकील खान ब्यावली होते,प्रा. अकील खान यांनी आपले विचार व्यक्त करताना कोरोना काळात शिक्षकांनी शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा शेत्रात आपल्या जबाबदाऱ्या व कर्त्तव्य पार पाडुन आदर्श निर्माण केले.शिक्षकाची व समाजाची जबाबदारी सोबत क्रिडा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांनी कशाप्रकारे विध्यर्थी घडवून आदर्श निर्माण केले हे हि व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्लम शेख यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे समाजात स्थान व कर्तव्य या बद्दल मार्गदर्शन केले. संघटनेचे सरचिटणीस अज़िज़ अब्दुल गनी रंगेज यांनी संघटन चे कार्य व उद्देश स्पष्ट करुन कार्यक्रमा ची रूपरेषा व्यक्त केली.तर जळगाव जिल्हा अध्यक्ष मुश्ताक भिस्ती यांनी संघटने ने केलेल्या विशेष कार्या ची नोंदकरुन संघटनेत सामिल होण्या चे आव्हान ही केले, अनिस अहमद शेख ,एस.एम फारूक, इक्बाल मिर्झा , प्राध्यापक डा.चान्द खान पठाण यांनी हि विचार व्यक्त केले.कार्यक्रम चे सूत्रसंचालन तबरेज़ शेख यांनी केले . यशस्वीतेसाठी प्रा.मोहम्मद रफीक ताहेर भुसावळ,मोहसीन खान, यांच्यासह संघटनेत च्या पदाधिकारी व सदस्यानी परिश्रम घेतले. ज़िया बागवान यांनी आभार व्यक्त केले.जिल्हा भरतील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली तग्य मंडळी उपस्थित होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close