देवपूर नवरंग जलकुंभ परिसरात आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

अब्दुल रहेमान मलिक यांची रिपोर्ट

धुळे शहरातील देवपूर बस स्टँड परिसरात तसेच नवरंग जलकुंभ भागात गरीब वस्ती असून या परिसरात हात मजुरीवर काम करणारे लोक मोठ्या प्रमाणात राहतात तसेच या भागात दवाखाने ही असल्याने गरीब व गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना या भागात जेवणासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. गरीब व गरजू लोकांचे हाल होऊ नये यासाठी आज सोमवारी आस्था स्वयंरोजगार महिला बचत गटाच्या माध्यमातून
धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी या भागात गरजू लोकांसाठी जेवणाची सोय व्हावी म्हणून शासनाकडे शिवभोजन ची मागणी केली होती. त्याला योग्य तो प्रतिसाद देत शिवभोजन मंजूर करण्यात आले आहे. त्याचे आज शनिवारी शहराचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी या परिसरातील नागरिकांनी आमदार साहेबांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले आहे. या उद्घाटन प्रसंगी आमदार फारूक शाह,नगरसेवक नासीर पठाण, सईद बेग, गनी डॉलर, सईद बेग , कैसर पेंटर, सउद आलम, शाहिद सर ,चिराग सर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा शेख, शहबाज शाह, आसिफ शाह आदी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close