दिवसाढवळ्या तरुणाचा खून करून त्याची नवीन दुचाकी घेऊन पोबारा करणाऱ्या खुन्ह्यांच्या मुसक्या आवळण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

अब्दुल रहेमान मलिक

धुळे  –पोळा सणाचे औचित्य साधून शोरुम मधुन नवीन मोटरसायकल घरी आणत असतांना तरुणाचा अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करून नवीन मोटरसायकल घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 21 वर्षीय प्रेमसिंग गिरासे असे या मृत तरुणाचे नाव आहे. घरातील कर्ता एकुलत्या एक मुलाचा मृत्यूची घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
यासंदर्भात प्रेम सिंग गिरासे या तरुणाचा नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी चिमठाणे फाटा या ठिकाणी एकत्र जमून रास्तारोको केला आहे.
तरुणाच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी हा रास्ता रोको ग्रामस्थांतर्फे करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित हे घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला परंतु नागरिकांचा रोष हा पोलीस प्रशासनावर देखील कायम असल्याचे या रास्तारोको दरम्यान बघायला मिळाले आहे.

यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी संतप्त ग्रामस्थांना ारेकर्‍यांना पकडण्याचे आश्वासन देत असताना जर मी मारेकर्‍यांना पकडले नाही तर मी पोलीस अधीक्षक पदाचा राजीनामा देईल असे भावनिक आवाहन देखील करीत ग्रामस्थांना रास्तारोको थांबविण्याचे आवाहन केले आहे.
त्यानंतर नागरिकांना पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिलेल्या शब्दाच्या तब्बल तासाभरातच पोलीस प्रशासनाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नुसार शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे हा 21 वर्षीय तरुण आज शिंदखेडा येथील शोरुम मधून नवीन प्लाटीना मोटरसायकल घेण्यासाठी गेला होता. पोळा सणाच्या दिवशी मोटरसायकल घेऊन घरी परत येत असतांनाच दरणे ते चिमठाणे रस्त्यावरील सबस्टेशन जवळ संशयितांनी त्याचा रस्त्यातच धारदार शस्त्राने वार करत खून करून नवीन मोटरसायकल घेऊन अज्ञात संशयित पोबारा केला आहे. प्रेमसिंग गिरासे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे ये-जा करणाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर उपस्थितांनी तात्काळ जवळील चिमठाणे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत असल्याचे बघुन धुळे येथे जाण्याचा सल्ला दिला तेथून धुळे जात असतांनाच रस्त्यावरच प्रेमसिंग गिरासे यांचा मृत्यू झाला आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close