बलात्कारित पुरुषांना दगडाने ठेचून जागीच ठार करा? मनियार बिरादरीचे राष्ट्रपती, पंतप्रधान ,महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना साकडे

जळगाव —संपूर्ण भारतात दर २५ मिनिटांमध्ये एका महिलेसोबत बलात्कार होतो व त्या महिलेला आम्ही वर्षानुवर्षे न्याय देऊ शकत नाही ही खेदाची बाब असून या बलात्कारित पुरुषांना भर चौकात दगडाने ठेचून मारा व हा कायदा अथवा वटहुकूम त्वरित लागू करा अशी एकमुखी मागणी जळगाव जिल्हा मनियार बिरादरी ने भारताचे राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका ठरावाद्वारे केलेली आहे.

रविवारी जळगाव जिल्हा मनीयार बिरादरी च्या रथ चौक येथील कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीत हा ठराव पारित करण्यात आला.

नोटबंदी ,जीएसटी, कृषी कायदे, सीएए , लागू होऊ शकतात कलम ३७० रद्द होऊ शकते तर दिशा व शक्ती कायद्याला उशीर का?

एकाच रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते जीएसटी लागू शकतो कृषी कायदे ,सीएए व ३७० चे कायदे दोन्ही सदनात पास होऊ शकतात तर बलात्कारी पुरुषाला दगडाने ठेचून मारण्याचा वटहुकूम व कायदा का अमलात येऊ शकत नाही ? अशी खंत सुद्धा व्यक्त करण्यात आली एवंढेच नव्हे तर दिशा व शक्ती कायदा ची अंमलबजावणी का होऊ शकत नाही?

स्कॉटल्याड नंतर मुंबई पोलिसांचे वर्चस्व

संपूर्ण जगात स्कॉटल्याड यानंतर मुंबई पोलिसांचे वर्चस्व अधोरेखित आहे त्या मुंबई शहरात ज्याप्रमाणे निर्भयावर बलात्कार करून तिला जीवे मारण्यात येते व त्याच्या आरोपीला पकडून सुद्धा मुख्यमंत्री ३० दिवसात पोलिसांनी दोषारोपपत्र सादर करावे असे आदेश देत असेल तर न्यायालयाचा निकाल केव्हा लागेल? वास्तविक पाहता महाराष्ट्राने हे बघितले आहे की एका रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवली जाते ? सकाळी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो ? विधी मंडळाने बारा आमदारांची शिफारीश करून सुद्धा तिची अंमलबजावणी होत नाही ? केंद्रीय मंत्र्याला एका भाषणा मूळे अटक करण्यात येते ?अशा या समयी महाराष्ट्रात जर बलात्काराचे प्रमाण वाढले असेल तर माननीय राज्यपाल कोषयारी व माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शक्ती कायदा लावण्यास तत्परता का दाखवत नाही?

वटहुकूम काढून ६ महिन्यात ठेचून मारण्याची शिक्षा पारित करा?

महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक तत्त्वावर ६ महिन्यासाठी वटहुकूम जारी करून बलात्कारी पुरुषाला भर चौकात दगडाने ठेचून मारण्याचा वटहुकूम जारी करावा व सहा महिन्यात याचा परिणाम दुसरे गुन्हेगारावर काय होतो ते बघावे व नंतर त्याचं कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी सुद्धा या सभेत करण्यात आली.

पुरे झाले निषेध- कॅन्डल मार्च आता रस्त्यावर उतरावेच लागेल

बलात्कार करणाऱ्यांना ज्याप्रमाणे जात-धर्म नसतो त्याप्रमाणे बलात्कारित महिला सुद्धा जात धर्माच्या पलिकडच्या असतात त्यामुळे प्रत्येक समाजाने पीडिता ही कोणत्या समाजाची आहे हे न बघता आता रस्त्यावर येऊन तिला न्याय मिळवून द्यायला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक असल्याचे मत बिरादरी चे अध्यक्ष फारूक शेख यांनी व्यक्त केले आहे.

बिरादरी च्या सभेत यांची होती उपस्थिती

जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर, संचालक हारून मेहबूब, अल्ताफ शेख, रउफ रहीम, जूनकर नैन, सलीम मोहम्मद, नशिराबादचे रियाज शेख, शिरसोली चे नबी मिस्तरी, लुकमान शेख, पालधी चे अजित शेख, धरणगाव चे फिरोज शेख ,नसीम बी शेख सत्तार, खेडी कडोली चे शेख रुबाब, नफिसा बी शेख हसन, मुस्कान बी शेख, शेख रफीक, आफ्रीन अंजुम शेख, फिरीज शेख यांची उपस्थिती होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close