वाघूर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

भुसावळ प्रतिनिधी | वाघूर धरणाची जलपातळी आज दुपारी तीन वाजता 233.79 मीटर झाली आहे. वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. येत्या 24 तासांत वाघूर धरणातील जलसाठा पूर्ण होण्याची शक्यता असल्याने धरणातून वाघूर नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची कार्यवाही होवू शकते. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, नदी काठच्या वराडसिम, कंडारी या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. दोघेही गावे नदीकाठी असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी. असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे.

 

नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

 

                                            

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close