विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिवस साजरा

मोहम्मद फ़जल

जळगाव  —विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य अमितसिंह भाटिया, समन्वयीका स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून केली. राजभाषा हिंदी दिवसाच्या निमित्ताने 8/9/21 ते 14/9/21 पर्यंत हिंदी दिवस सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये इयत्ता पहिलीसाठी काव्य गायन, दुसरीसाठी कथाकथन, तिसरी साठी मराठी भाषेतून हिंदी भाषेत अनुवाद, चौथीसाठी काव्यवाचन, तर पाचवीसाठी निबंध लेखन व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व वर्गातील तीन विजेते या स्पर्धेतून निवडण्यात आले. इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी गुंजन चौधरी हिने हिंदी दिवसाविषयी माहिती सांगितली. इयत्ता चौथी चा विद्यार्थी विरेन वारदे याने हिंदी दिवसा निमित्त कविता सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना हिंदी दिवसा विषयी अधिक माहिती साठी चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर शाळेचे प्राचार्य अमितसिंह भाटिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी सुलक्षणे यांनी केले. आभार प्रदर्शन अमर जंगले यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांची नावे प्रमिला भादूपोता यांनी जाहीर केली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close