महामार्ग पोलीस केंद्र धुळे व श.वा.शा. धुळे यांचे संयुक्त विद्यमाने चालक दिन साजरा

अब्दुल रहेमान मलिक

महामार्ग पोलीस केंद्र धुळे व श.वा.शा. धुळे यांचे संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर रोजी चालक दिन साजरा करण्यात आला.डॉ.भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलीस महासंचालक (वा.), महाराष्ट्र राज्य, मुंबई, दिगंबर प्रधान, पोलीस अधिक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, मा.चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक धुळे, मा. शांताराम वळवी,पोलीस उपअधिक्षक, महामार्ग पोलीस नाशिक विभाग व श हेमंतकुमार भामरे, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस धुळे उपविभाग, श्रीमती संगीता राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श.वा. शा. धुळे यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला महामार्ग पोलीस केंद्र धुळे व श.वा.शा. धुळे यांचे संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर रोजी चालक दिन साजरा करण्यात आला निमित्त महामार्ग पोलीस केंद्र धुळे व श.वा.शा. धुळे यांचे संयुक्त विद्यमाने ड्रायव्हर सेवा ट्रस्ट धुळे, भारत पेट्रोलियम अवधान, धुळे यांचे सहकार्याने वाहतूक नियमांचे प्रबोधन, वाहन चालकांचा गुणगौरव व त्यांच्या देशाच्या प्रगतीच्या संयुक्त विद्यमाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 ते 11.30 वा दरम्यान भारत पेट्रोलियम अवधान, धुळे येथे आयोजित करण्यात आला.

  कार्यक्रमासाठी ड्रायव्हर सेवा ट्रस्ट धुळे चे दिनेश शर्मा, BPCL चे ऑपरेटर चेतन गोसावी व पंप मॅनेजर मच्छिंद्र विधाते, इतर वाहतूक संघटनेचे पदाधिकारी तसेच आजच्या दिनाचे सत्कारमूर्ती वाहन चालक असे एकूण 50 ते 60 लोक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात चालकांना वाहतूक नियमांचे प्रबोधन करून यांचा गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. सोबतच .चहा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली.
सदर कार्यक्रमात पोनि हेमंतकुमार भामरे, मसपोनि संगीता राऊत, बीपीसील ऑपरेटर चेतन गोसावी, ट्रान्सपोर्ट यूनियनचे पदाधिकारी तसेच वाहन चालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज रोजी करण्यात आलेला कार्यक्रमाचा सखोल अहवाल वरिष्ठांना पाठवीला जाईल.

वाहन चालक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा पोउपनि गणेश देवरे,पोउपनि चुनीलाल सैंदाणे,तसेच सर्व अंमलदार वृंद महामार्ग पोलीस केंद्र, धुळे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close