जवाहर नवोदय विद्यालयामध्ये नववी आणि सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव, दि. 29 : जवाहर नवोदय विद्यालयातील नववीच्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या प्रक्रियेची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर, 2021 आहे. परीक्षा 9 एप्रिल, 2022 रोजी जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ येथे निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर 10.00 ते 12.30 या कालावधीत होईल. या परीक्षेचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज लिंक www.navodaya.gov.in किंवा www.nasadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

 

सर्व संबंधितांनी माहितीपत्रकाचे काळजीपूर्वक वाचन करून यंदा आठवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबंधित पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर. पी. पाण्डेय (8668389523), जी.आर. सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.

 

 

सहावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू:-

 

        जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या प्रक्रियेची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर, 2021 असून ही परीक्षा शनिवार 30 एप्रिल, 2022 रोजी होईल.

 

जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर 11.30 ते 1.30 या कालावधीत परीक्षा होईल. सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज लिंक www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

 

सर्व संबंधितांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचन करून पाचवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर. पी. पाण्डेय (8668389523), जी.आर. सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close