नथुराम गोडसे यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या महेश मांजरेकर यांना महाराष्ट्रात गोडसे सिनेमा निर्माण करू देणार नाही— बाबासाहेब पाटील प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

मुंबई —चित्रपट निर्माता व अभिनेता असलेले महेश मांजरेकर यांनी गांधी जयंती निमित्त नवीन “गोडसे”नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आणि त्या चित्रपटाचे टिझर त्यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज केले त्यांनीच घोषणा केलेला सिनेम हा महेश मांजरेकर यांच्या वैचारिक पातळी किती हीन दरजेची आहे हे महाराष्ट्राच्या जनते समोर सिद्ध केले आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीं ज्या पद्धतीने भारतात अद्वितीय कार्य् केले अशा महात्माा गांधीच्या जयंतीदिनी त्यांच्याच मारेकरी असलेल्या नथुराम गोडसे यांच्या आयुष्यावर सिनेमाा निर्माण करण्याचा मूर्खपणाचाा घाट महेश मांजरेकर यांनी घातला आहे.
महेश मांजरेकर यांनी “मी शिवाजी राजे भोसले बोलतो” हा सिनेमा तयार करून त्यावेळी शिवाजी महाराजांच्या आधुनिक विचारांचा वारसा लाभलेला विषय मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातल्या जनतेसह आम्ही त्यांचा नेहमी सन्मान सुद्धा केला आहे. दरम्यान नथुराम गोडसे यांच्या चित्रपट निर्मिती मागे विकृत मानसिकता असलेल्या काही यंत्रणेचा तर हात नाही ना? महात्मा गांधीच्या लोकप्रियतेला ठेस पोहोचवून त्यांचा प्रति द्वेष निर्माण करून नथुराम गोडसे ला हिरो करण्याचा प्रयत्न तर नाहीना अशा प्रकारच्या सिनेमातून महेश मांजरेकर काय साध्य करू इच्छितात याचा खुलासा सुद्धा महेश मांजरेकर यांनी करावा कारण या महाराष्ट्राच्या मातीत अश्या विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तींचे उदात्तीकरण करण्याचा काम कोणी ही केले तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कदापी ही खपवून घेणार नाही.त्यामुळे आम्ही महेश मांजरेकर यांना आधीच समज देऊ इच्छितो की त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या आदराला आणि सन्मानाला ठेस पोहोचून आमच्या भावनाला कुठेही ठेच पोहोचणार नाही अशा प्रकारचे कृत्य या महाराष्ट्रात करू नये. नथुराम गोडसे चा इतिहास सर्व विश्वाला सुपरिचित आहे असे असताना राष्ट्रपिता यांनी केलेल्या कार्याला दाबून नाथूराम गोडसे सारखे विचारांना विकसित करून सामाजिक स्वास्थ्याला हानी पोहोचू नये हीच माफक अपेक्षा आहे. चे मत *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे*.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close