मेहरूण परिसरामध्ये महापौर यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबीर; पुढील तीन ते चार दिवस राहणार सुरू

जळगाव | शहरातील मेहरुण परिसरातील राज माध्यमिक विद्यालयात नागरिकांसाठी भव्य लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात दिवसभरात 300 हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी महापौर सौ.जयश्री महाजन यांचे आभार मानले आहेत. लसीकरण शिबीरावेळी महापौर सौ.जयश्री महाजन, नगरसेवक विक्रम (गणेश) सोनवणे, नगरसेविका सौ.जिजाबाई भापसे यांचे सुपुत्र चंदू भापसे, नगरसेविका सौ.निताताई सोनवणे व शिवसेना उपमहानगरप्रमुख ललित धांडे आदी उपस्थित होते.

 

जळगाव शहरात महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे मोफत लसीकरण वेगाने सुरु आहे. याकरिता महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या प्रयत्नाने शहरातील विविध भागात लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात येत असून जळगाव शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न ही सुरु आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागात लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

 

या अनुषंगाने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील प्रभाग क्र.19 मध्ये भव्य लसीकरण शिबीराचे आयोजन राज माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी दिवसभरात 300 हून अधिक नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पुढील तीन ते चार दिवस हे लसीकरण शिबीर राज माध्यमिक विद्यालय येथे सुरु राहणार आहे. तसेच उद्या बुधवार, दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी जय दुर्गा माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे देखील भव्य लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या लसीकरण शिबीराचा लाभ घेत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन महापौर सौ.जयश्री महाजन यांनी याप्रसंगी केले.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close