जप्त केलेल्या वाहनांचा 18 रोजी यावलला लिलाव

यावल | तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, यावल येथे जप्त केलेल्या पाच वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, यावल यांच्याशी संपर्क साधावा, असे तहसीलदार यावल यांनी प्रसिध्दीस दिलेलया शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close