वडाळागाव येथील अण्णाभाऊ साठेनगर, महेबूबनगर,मदारनगर,सादिकनगर येथे पाईपलाइन कामा चे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक —वडाळागाव येथील अण्णाभाऊ साठेनगर, महेबूबनगर,मदारनगर,सादिकनगर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे.येथील नागरिकांनी या बाबत वेळो वेळी आवाज उठवून तक्रारी केल्या.याची दखल घेऊन पाण्याची पाईपलाईनसाठी प्रभाग क्र. 30 मधील चारही नगरसेवकांनी महानगरपालिकेे च्या माध्यमातून निधी मंजूर करुन घेतला.आता या कामाची सुरुवात नाशिक पश्चिम च्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. आमदार निधीतून काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले त्याचे लोकार्पणही ही हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा नेते महेश हिरे,प्रभागाचे नगरसेवक ॲड.श्याम बडोदे,सुनिल खोडे, सचिन कुलकर्णी, नगरसेवक अँड.अजिंक्य साने, द्वारका मंडल अध्यक्ष सुनिल देसाई,भाजपचे फिरोज शेख, रफिक शेख, हनिफ शेख, शकील शेख, असिफ सय्यद, मुश्ताक लालू, मोहसीन शेख, मोसीन शाह,गुफराण शेख,भाऊराव बत्तीसे, रामजी थोरात, सुनील रणपिसे,राम बडोदे, सुजित मोरे हे उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close