के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न.

जळगाव. येथील अंजूमन खिदमते खल्क संचलित के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर मध्ये भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मुख्याध्यापक अकिल खान ब्यावली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ह्या शिकवणी ला केंद्र मानुन विचार व्यक्त केले व बाबा साहेबांनी उपरोक्त उक्ती कशी सिध्द करून न केवळ स्वतःच्या,अपितु संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी मार्ग मोकळा केला या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. मझहरुदिन शेख, तबरेज शेख यांनी हि बाबा साहेबांच्या शिक्षण व समाज हिता साठी केलेल्या महान कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या जागतिक दृष्टीकोना बद्दल विचार व्यक्त करुन त्यांचे अनुकरण व्हावे हि अपेक्षा व्यक्त केली. ह्या वेळी शाह ज़ाकिर अमानुल्लाह,जमीला शेख उपस्थित होते. कार्यक्रम चे उद्दिष्टे व सुत्र संचालन सांस्कृतिक मंडळाचे तबरेज शेख यांनी, तर आभार मुश्ताक भिस्ती यांनी व्यक्त केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close