समाज कल्याण मध्ये सेवानिवृत्तांच्या देय लाभांसाठी विशेष मोहीम आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांचा पुढाकार पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांनी मानले शासनाचे आभार.

औरंगाबाद, प्रतिनिधी, दि.22, आकाश ठाकूर

 

समाज कल्याण विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नये त्यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय लाभांसाठी विभागाच्या वतीने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे दिली आहे.

समाज कल्याण आयुक्तालयाने विभागाच्या विविध संवर्गातील १६० कर्मचाऱ्यांना नुकताच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांशी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधून त्यांना माहिती दिली. विभागाचे कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेळेत सोडविणे महत्त्वाचे असून सर्व कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाच्यावतीने न्याय दिला जात असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात राबवलेल्या उपक्रम तसेच विविध मोहीमा यशस्वी करून दाखवल्याने कामकाजात सुधारणा झाली आहे. उत्कृष्ट काम करणा-या आदर्श कर्मचाऱ्यांचा देखील लवकरच विभागाच्या वतीने गौरव करणार असल्याचेही आयुक्त यांनी सांगितले.

आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून विभागास धन्यवाद व्यक्त केले आहे. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोहीम तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रलंबित प्रश्न निकाली काढणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

यावेळी श्री. किशोर रहाटे, गृहपाल नागपूर विभाग यांनी “कर्मचाऱ्यांच्यावतीने आयुक्त समाजकल्याण यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे व कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करून विभागास धन्यवाद दिले”.

तर श्री.कैलास घोडके सेवानिवृत्त वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांनी“ समाजकल्याणच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली निघाले आहेत आयुक्त यांनी घेतलेले धाडसी निर्णय निश्चितच विभागाच्या कामकाजाला अधिक उंची प्राप्त करून देतील असे त्यांनी सांगून विभागाचे धन्यवा व्यक्त केले”.

“समाज कल्याण विभागाचे मंत्री धनंजय मुंडे व सचिव सुमंत भांगे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, त्यातुन प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याच्या जोरावर लाखोंच्या संख्येने प्राप्त झालेल्या संर्दभांवर दोन वर्षात कार्यवाही करण्यात आली आहे”.

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close