
शहरात भारनियमन बंद करण्यासाठी उपकार्यकारी अभियंतांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले निवेदन*
प्रतिनिधि,सलमान खान
खुलताबाद :
शहरातील व ग्रामीण भागातील अनियमित भारनियमन लोडशेडिंग बंद करण्यासाठी नागरिकांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता उस्मान खान बिस्मिल्ला खान यांना माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन व माजी उपनगराध्यक्ष नवनाथ पा. बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनियमीत लोडशेडिंग बंद करणे रोजदार व इतर सणासुदीच्या काळात व्यवसाय करणाऱ्या व नागरिकांना उष्णतामानामुळे आजारी पडत असल्याने तात्काळ लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली असुन लोडशेडिंग बंद केली ना तर आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
लोडशेडिंग रात्रीच्या वेळी होत असल्याने चोरीचे प्रकार घडू शकतो व रात्री अपरात्री लोडशेडिंग होत असल्याने उन्हाळ्यात रमजानचे दिवस असुन रात्री सहेरच्या वेळी फार अडचण येत असुन हि लोडशेडिंग बंद करण्याची मागणी शरफोद्दीन रमजानी, मुनीबोद्दीन, हाजी एकबाल, नाजीर अहेमद, शेख परवेश, मसियोद्दीन, आरीफ खान, फकिर महम्मद कुरैशी, जुबेर लाला, ज्ञानेश्वर बारगळ, भागिनाथ मरकड आदी उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market