जगदंबा पंचमी उत्सवाच्या पुर्वतयारी बाबत बैठक संपन्न*

प्रतिनिधि सलमान खान :
खुलताबाद : येथील मंगल पेठ बाजारपेठ येथील श्री मंगला देवीच्या मंदिर परिसरात श्री जगदंबा पंचमी उत्सव यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. लवकरच पंचमी उत्सवाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्याचबरोबर करोना बाबत सर्व निर्बंध शिथिल केले असले तरी योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करुन सर्व मंगल पेठ बाजारपेठ येथील नागरिकांनी सोपवलेली जबाबदारी योग्य पध्दतीने व परस्पर समन्वयाने पार पाडण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पुर्वतयारीची बैठक श्री मंगलादेवी मंदिरात जेष्ठ नागरिक दिगंबर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पंचमी उत्सवाच्या आयोजनाबाबतची सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. यावेळी उत्सव समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.


श्री जगदंबा पंचमी उत्सव समिती कार्यकारिणी याप्रमाणे: अध्यक्ष किशोर विश्वनाथराव भावसार, उपाध्यक्ष गणेश कृष्णा सावजी, सचिव निलेश नंदकिशोर चव्हाण, सहसचिव गजानन भाऊसाहेब पवार, कोषाध्यक्ष सागर चंद्रशेखर सावजी, प्रसिद्धीप्रमुख विजय एकनाथराव चौधरी, सदस्य सुदेश मनोज चव्हाण, हर्षल महेश सावजी, गणेश सुभाष मालोदे, दिनेश सुभाष कायस्थ, मयूर अनंतराव चौधरी, अक्षय अजय खरोटे, प्रसाद विजय रोजेकर( कुलकर्णी ). या बैठकीला मंगल पेठ बाजारपेठ येथील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुजीत जोशी यांनी केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close