खुलताबादेत भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतिने दावत-ए-इफ्तार : आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती*

सलमान खान प्रतिनिधि
आज दि 27 एप्रैल रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास भाजपा अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने रोजा-दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन शहरातील बाविस ख्वाजा दरगाहच्या मैदानामध्ये करण्यात आले. यावेळी शेकडो मुस्लिम नागरिक यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

या वेळी आमदार प्रशांत बंब यांनी मुस्लिम बांधवांसह रोजा इफ्तार करून सर्वाना रमजान व ईदच्या शुभेच्छा दिल्या.मानवता हा एकच धर्म आहे, या भावनेतून सर्वांनी एकमेकांचे सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करावेत.असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

यावेळी पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे, उप पोलिस निरीक्षक मधुकर मोरे, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, माजी नगर अध्यक्ष कैसरोद्दीन, दरगाह कमिटी अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, पंचायत समिती सभापती गणेश आधाने,पोलिस कर्मचारी, पंचायत समितीचे विविध पदाधिकारी शहरासह तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी व कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थित होते. दावते इफ्तार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा अल्पसंख्यक जिला उपाध्याक्ष मुख्तार पठाण, तालुका अध्यक्ष सत्तार पटेल,
शहर अध्यक्ष सैयद अफसर,शहर उपाध्यक्ष शेख आनिस यांनी परिश्रम घेतला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close