
खुलताबाद पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टीचे आयोजन : सर्व समाज बांधवांची उपस्थिती
खुलताबाद प्रतिनिधी/सलमान खान
खुलताबाद पोलीस ठाण्यात रोजा उपवासानिमित्त पोलीस विभागाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, दरम्यान शहरासह तालुक्यातील हिंदू – मुस्लिमसह सर्वच समाजा बांधव या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गुरुवार दि. २८ रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद अघाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद अघाव, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या वेळी नगराध्यक्ष अॅड.एस.एम.कमर, भद्रा मारुती संस्थान अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन, सभापती गणेश अधाने, गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर, बाबासाहेब बारगळ, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शिवसेना तालुकाप्रमुख राजु वरकड, महेश उबाळे, माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग, दर्गा कमेटी अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोलीस नाईक शेख जाकिर, सुदाम साबळे, गोपनीय शाखा के.के. गवळी, सुहास दबीर, काॅंग्रेस शहर अध्यक्ष अब्दुल समद टेलर, पत्रकार संघ तालुकाध्यक्ष राजेंद्र बढे, सरपंच विशाल खोसरे, रामदास चंद्रटिके यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.