सातारा खंडोबाच्या जीर्णोद्धारासाठी 56 कोटी मंजूर : आमदार संजय शिरसाट

 

प्रतिनिधी,मनोज वडगावकर.

आमदार संजय शिरसाट यांच्या प्रयत्नातून संभाजीनगर येथील पश्चिम विधानसभा मतदार संघात असलेल्या सातारा या भागातील शहराचे ग्रामदैवत असलेले पुरातन हेमाडपंती तीर्थक्षेत्र खंडोबा मंदिराचे जतन, संवर्धन, पुनर्वसन व परिसर विकासाची कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून ५६ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आमदार संजय शिरसाट यांनी मागणी होती की, पश्चिम विधानसभा मतदार संघात असलेल्या शहराचे ग्रामदैवत खंडोबा मंदिराचा व परिसर विकसित करण्यात यावा. दीपमाळ, सभामंडप, भक्तनिवास, मंदिर परिसरातील व्यापारी स्थापना,दुकाने, पर्यटक व भाविकांसाठी स्वच्छतागृहे, लँडस्केप विकास, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वाहनतळ विकास, पथदिवे, हायमास्ट व इतर विकास कामे, विद्युतीकरण करणे व इतर कामे न करण्यात करावी म्हणून अशी आग्रही मागणी होती, हे विकास कामे झाल्यास या भागातील व शहरातील अनेक नागरिक व युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. यासह खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना देखील सोयीसुविधा उपलब्ध होतील
.
राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या
(१)मंदिराचे बाहेरचे व आतील दगड रसायनांनी साफ करुण त्यावर संरक्षणात्मक रसायनांचा थर देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे दगडांची झीज कमी होण्यास मदत होईल,
(२) दगडांना असणारे तडे हे चुना, दगडांची भुकटी व रसायनांच्या सह्याने भरून काढण्यात येणार आहे.
(३) गर्भगृहाच्या जेत्याच्या दगडांवरील नक्षीकाम दगड ठिसूळ झाल्याने नष्ट झालेले आहे ते चुना, दगडांची भुकटी व रसायनांच्या साहाय्याने पुन्हा बांधण्यात येईल
(४) मंदिर शिखराच्या पडलेल्या विटांचे संवर्धन, खराब झालेला दर्जा काढून टाकून पुन्हा भरणे, खराब झालेला गिरावा पुन्हा करणे इत्यादी कामे प्रस्तावित आहेत.
(५) मंदिराच्या सभामंडपाची इतर समकालीन मंदीरानुसार पुर्नबांधणी बांधणी करणे
.(६) मंदिरासमोरील दीपमाळेचा जीर्णोद्धार / संवर्धन
(७) मंदिरासमोरील नगारखान्याचा जीर्णोद्धार / संवर्धन
(८) मंदिराशेजारील जागेचा विकास संवर्धन
९) भक्तनिवास,
१०) मंदिर परिसरातील दुकाने, पर्यटक व भाविकांसाठी स्वच्छतागृहे,
११) लँडस्केप विकास,
१२) पिण्याच्या पाण्याची सोय करणे,
१३) वाहनतळ विकास,
१४) पथदीप,
१५) हायमास्ट व इतर विकास कामे,
१६) विद्युतीकरण करणे तसेच मंदिरापर्यंतच्या २ की.मी. रस्त्याचे अपग्रेडेशन, मंदिराजवळील नाल्यावरील कल्व्हर्ट, मंदिर परिसरात विस्थापन, विस्थापनातून रिकाम्या झालेल्या जागेचा विकास करणे या इत्यादी विकास कामे करण्यात येणार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील आभार मानले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close