
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील सेवकांसाठी “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” चित्रपटाच्या खास ‘शो’ चे आयोजन
जळगाव | सध्या चर्चेत असलेला व मराठी चित्रपट सृष्टीला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार सुपरहिट चित्रपट जो सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच ‘शो’ बुक करण्यात आले होते.
तसाच एक अनोखा ‘शो’ म्हणजे जळगावात 13 मे पासुन पुढील तीन दिवस वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रासाठी बुक करण्यात आला होता. यात डॉक्टर्स, आरोग्यसेवक, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, व वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक आदींसाठी खास “शो” चे आयोजन करण्यात आले होते.
महापौर सौ. जयश्री महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे उप-अधिष्ठाता डॉ.किशोर हिंगोले, शासकीय आयुर्वेदीक रूग्णालयाचे चे डॉ.रमन धुळरकर, डॉ.ऐश्वर्या पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करून, पुष्पहार अर्पण करून आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटाचा खास ‘शो’ च्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या समयी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, नगरसेवक गणेश सोनवणे, अँड.रोहीणी इंगोले, सारा मल्टिस्पेशलीटी हॉस्पिटलचे डॉ.मिनाज पटेल, डॉ.अक्षय सरोदे, डॉ.वैभव सोनार, डॉ.जितेंद्र सुरवाडे, डॉ.विकास पाटील, डॉ. दिव्या शेकोकार आदी डॉक्टर्स व त्याचे परीवार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या प्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे, भावेश ढाके, महानगर समन्वयक दीपक घ्यार, सह-समन्वयक गणेश गुरव, विभाग समन्वयक विशाल निकम आदींची उपस्थिती होती.
पवन सोनवणे, अनिल पवार, विशाल परदेशी, दीपक पाटील, राहुल पाटील, रोशन ठाकरे, सागर सोनवणे, राजेंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, शुभम सोनवणे, रविंद्र सोनवणे, भाग्येश पाटील, धिरज राठोड, जयेश सोनवणे यांसह वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव शहर व जिल्हा पदाधिकारी समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपटाचे यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व समन्वयकांनी परीश्रम घेतले.
यावेळी मान्यवरांनी वंदनीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या बद्दल आपल्या भावाना व्यक्त केल्या व ढोल- ताशांच्या गजरात सर्व आरोग्यसेवकांनी जल्लोष केला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले होते. रेडप्लस ब्लड बँक व सारा मल्टिस्पेशलीटी हॉस्पिटल यांचे सहकार्य मिळाले.