उद्धवजी ठाकरे यांची संभाजीनगरची सभा अविस्मरणीय करण्यासाठी तयारीला लागा – मराठवाडा विभागीय सचिव अशोकजी पटवर्धन

 

बीड आढावा बैठकीत आदेश

बीड – मराठवाड्यात संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची दिनांक ८ जून रोजी सभा होत आहे. ही सभा ऐतिहासिक ठरावी यासाठी बीड जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी सर्वतोपरी तयारीला लागावे असे मराठवाडा विभागीय सचिव अशोकजी पटवर्धन साहेब यांनी आढावा बैठकीत शिवसैनिकांना संबोधन केले.
पूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना यात बदल होत आहे योग्य नियोजन आखणी करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला ताब्यात घेऊन उमेदवार निवडून आणायचे आहेत यासाठी संघटन, सुसंवाद व पक्षबांधणी करून रिक्त जागेवर तात्काळ पदाधिकारी नियुक्त करण्याचे आदेश यावेळी विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांनी दिले.

 

 

जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. नवनियुक्त मराठवडा सचिव अशोकजी पटवर्धन यांचा सत्कार सोहळा संपन्न करून बैठकीला सुरुवात झाली दिनांक ८ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची संभाजीनगर येथे सभा होत आहे यासाठी नियोजनबद्ध आखणी करून बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिक या सभेस उपस्थित राहतील अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी यावेळी दिली.

यावेळी आढावा बैठकीस माजी मंत्री बदामराव पंडित, महिला आघाडी सह संपर्क प्रमुख अलकाताई डावकर,युवासेना जिल्हाधिकारी सागर बहिर,शिव सहकार सेना जिल्हा संघटक पंकज कुटे,किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते,माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक,माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे,उप जिल्हाप्रमुख बंडु पिंगळे,हनुमान जगताप,गणेश वरेकर,आशिष मस्के,भाऊसाहेब लटपटे,सुशील पिंगळे,लक्ष्मण बहिरवाळ सर,शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघण,राहुल चौरे,किरण चव्हाण,शहर प्रमुख सुनिल सुरवसे,परमेश्वर बेदरे,माजी सभापती सुनिल अनभूले,नगरसेवक संजय उडान,किशोर जगताप,दिलीप डावकर,विष्णूपंत रसाळ,दिनकर कदम,विलास बडगे,गिरीश देशपांडे, आकाश जगताप,हुसेन शेख,ॲड.उज्वला भोपळे,छगनराव काळे,

 

जगदीश उबाळे,ज्ञानेश्वर सातपुते,कल्याण कवचट,साहेबराव पोपळे,सखाराम देवकर,संगिता वाघमारे,ललीता अडाने,शारदा डुलगज,विद्या चाळक,दामोधर साळुंखे,दीपक गाडीवान,सुभाष गायकवाड,प्रमोद धनवे,स्वप्नील मुळे, चंद्रसेन काळे,प्रकाश इंगळे,मधुकर शिंदे,सुरेश माने,सुरेश सेठे,लक्ष्मण ठाकूर,काकडे बी.बी, हनुप्रसाद पांडे,संजय ढाकणे,अशोक सोळंके,अभिमान शेंडगे,गणेश उगले,शेख रशीद,शुभम कतांगले,रोहित चौरे,रवी वखरे,निखिल चौरे,गौरव वायभट,अंगद बहीर,कृष्णा सुर्वे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close