
वैद्यकीय मदत कक्षाच्या चोपडा तालुका समन्वयक पदी जयेश सोनवणे
चोपडा | वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या चोपडा तालुका समन्वयक पदी जयेश सोनवणे यांची नियुक्ती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
सोबतच चोपडा तालुक्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या विविध पदांवर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करून चोपडा तालुक्यात वैद्यकीय मदत कक्षाचा विस्तार करण्यात आला यात किरण माळी यांची (समन्वयक चुंचाळे- अकुलखेडा), निलेश सोनवणे (समन्वयक चुंचाळे-चौगांव), लोकेश शेटे (सह-समन्वयक चुंचाळे-चौगांव), तर कल्पेश शिंदे यांची (समन्वयक विष्णापुर गाव) येथील जबाबदारी देण्यात आली आहे.
या क्षणी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, मदत कक्षाचे जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे, भावेश ढाके, जळगाव महानगर समन्वयक दिपक घ्यार व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जळगाव जिल्हा टिम उपस्थित होती.