
प्रा. नितीन लालसरे यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक मंडळावर निवड…
प्रतिनिधी | भावेश ढाके
अत्यंत कमी वयामध्ये आपल्या आयुष्यातील यशाची अनेक शिखर सर केलेले मनमाड शहराचे भूमिपुत्र प्रा. नितीन लालसरे यांची मुंबई विद्यापीठा कडून निवड करण्यात आली असुन, ‘आदिवासी अभ्यासक्रम’ (Tribal Studies) या विषयाच्या अभ्यासक मंडळावर नुकतीच त्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा. नितीन लालसरे हे आपल्या जीवनातील अनेक संकटांचा सामना करून अत्यंत कमी वयामध्ये या पदापर्यंत पोहचले आहे , ‘आदिवासी अभ्यासक्रम’ (Tribal Studies) हा विषय कला शाखेमध्ये शिकवला जात असुन यामध्ये आदिवासी समाजातील जन-जाती , रूढी-परंपरा , जीवनमान या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. प्रा. श्री नितीन लालसरे हे मुलुंड कॉलेच ऑफ कॉमर्स या वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असुन गेल्या आठ वर्षांपासून ते नामदार मंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन देखील कार्यरत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अत्यंत जबाबदारीच्या असणाऱ्या अभ्यासक मंडळावर निवड होण्यासाठी प्रा. लालसरे यांना बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ. सुधीर निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले , नामदार मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. नितीन लालसरे यांचे विशेष अभिनंदन केले असुन , समाजातील सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.