कलाशिक्षक शामकांत वडींकर योग गौरव पुरस्कारा ने सम्मानित

नाशिक __दपणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फांऊंडेशन नाशिकच्या सहकार्याने बाळशास्त्री जांभेकर योग व कार्य गौरव पुरस्कार वितरण संमारभ दि.19/6/2022 रोजी कालीदास कलामंदिर, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कै.तात्यासाहेब रू.फ.पाटील शिक्षण मंडळ, देवगाव, संचलित.
गजानन विद्या मंदिर, पारोळा येथील उपक्रमशील कलाशिक्षकशामकांत प्रेमचंद वडींकर याना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कला व योग क्षैत्रात उल्लेखनीय कार्या केल्याच्या कामाची दखल घेऊन त्यांना योग गौरव पुरस्कारने सहपत्नी सन्मानित करण्यात आले. कलाशिक्षक शामकांत वडींकर हे शैक्षणिक, सामाजिक, कला, पर्यावरण, सांस्कृतिक, कुंग-फू कराटे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असतात त्याना जिल्हा स्तरिय, राज्य स्तरीय राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास श्री.संतोष जाधव, महाराष्ट्र राज्य कामगार नेते सुवर्णा कोठवदे, श्रीमती शबनम खान पर्यटन उदोजिका, डॉ. पुनम बिरारी योग पंडित लेखिका सायली पालखेडकर म.रा.बालहक्क संरक्षण आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य, प्रज्ञा कांबळे, समाज सेविका, पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पुरस्कार वितरण आयोजक श्री.महेंद्र देशपांडे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात कापसे पैठणी व डीम डेस्टिनेशन या पर्यटन क्षेत्रातील संस्थेने लकी ड्राँ काढण्यात आला त्यात शामकांत वडींकर यानां पर्याटनासाठी महाराष्ट्रातील निवडक 10 ठिकाणा पैकी एक ठिकाणी 2 रात्र व 3 दिवस राहाण्याची हॉटेलींग सुविधा देण्याचे कुपन देण्यात आले.
त्यांना योग गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन, आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी त्यांचे कौतुक केले व सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close