डॉक्टर वा इंजिनीयर व्हायचे आहे तर चला मनियार बिरादरीच्या शैक्षणिक उपक्रमात प्रवेश घ्या मोफत सवलतीचे दरात व स्कॉलरशिप द्वारे ५०℅ सूट ,फक्त ५० मर्यादित प्रवेश ,२ ऑगस्ट पासून सुरवात

जळगाव __जळगाव जिल्हा मानियार बिरादरी ही मागील वीस वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून वैवाहिक वाद विवाद ,सामूहिक विवाह, यासह इतर क्षेत्रात अग्रेसर आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील आतापर्यंत चे कार्य

मागील २० वर्षा पासून मनियार बिरादरीही वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांचा सत्कार करीत होती तसेच मनपा ची शाळा दत्तक घेऊन त्या द्वारे कार्य करीत होती प्रत्यक्षात शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याचा मानस हा पूर्वीपासून होता व आहे त्यासाठी बिरादरी प्रयत्नशील आहे..

2 ऑगस्ट पासून 11 वि च्या विद्यार्थ्यांना साठी नीट  नियमित( महाराष्ट्र स्टेट बोर्ड) अभ्यासक्रम

2 ऑगस्ट 2022 पासून जळगाव शहरातील मेहरून भागातील कुर्तबा क्लासेस यांच्याशी एक करार केला असून कुर्तुबा क्लासेस द्वारे यावर्षी 11वी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यां साठी नियमित अभ्यासक्रम ( स्टेट बोर्ड) सह नीट परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे. यासाठी फिजिक्स,केमेस्ट्री, बाओलॉजि व मॅथस या विषयातील तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यां साठी सुविधा

विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित असे वर्ग, अभ्यासिका, लायब्ररी सह साप्ताहिक चाचणी मालिका व वैयक्तिक शंका सत्र राबविण्यात येणार आहे. तसेच कोर्स फी 20 हजार रुपये हप्त्यामध्ये सुद्धा भरली जाऊ शकते.

जळगावात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात अल्प दारात 

जळगाव शहरात खास करून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी अकरावी बारावी विज्ञान शाखा नियमित वर्ग, शिकवणी वर्ग तसेच नीट ची तयारी करण्यासाठी कमीत कमी वर्षाला 40 ते 55 हजार रुपये फी आकारली जात आहे काही ठिकाणी ती जास्त सुद्धा आहे परंतु तेवढी फी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी देऊ शकत नसल्याने मानियार बिरादरीने अत्यल्प दरात म्हणजे फक्त 20 हजार रुपयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

हुशार, होतकरू, गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी खास योजना

या शैक्षणीक वर्षा साठी होतकरू व टॉपर विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेण्यात येणार आहे व त्या परीक्षेत उत्तीर्ण प्रथम 10 विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत प्रवेश देण्यात येईल, तसेच जे विद्यार्थी टॉपर नाही परंतु गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांपैकी आहे (10 विद्यार्थी) त्यांना सुद्धा स्कॉलरशिप द्वारे 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.
बाकी 50% रक्कम सुद्धा जर त्या विद्यार्थ्यां जवळ नसली तर त्यासाठी त्यांना विशेष बाब म्हणून मोफत शिक्षण देण्यात येईल.सदरचा लाभ हा फक्त प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.

मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या

फक्त अकरावी विज्ञान नियमित बॅच व नीट चा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून प्रथम फक्त 50 विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे या 50 पैकी दहा टॉपर विद्यार्थी यांना मोफत प्रवेश तर दहा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी त्यांना 50% स्कॉलरशिप मानियार बिरादरी उपलब्ध करून देणार आहे तरी विद्यार्थ्यांनी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व कुर्तुबा क्लासेसचे संचालक मुजम्मिल शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

पत्ता व संपर्का साठी..
कुर्तुबा क्लासेस

48/16, अक्सा नगर, मेहरून -जळगाव
मोबाईल क्रमांक 9890378600/ 9145424805
विशेष माहितीसाठी

9423185786( फारूक शेख)

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close