होराईज़न मल्टीप्रपस सोसायटी तर्फे गुणवंतांचे सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव , येथील होराईज़न मल्टीप्रपस सोसायटी तर्फे शाहूनगर परिसरातील ईयत्ता 5 वी ते 7 वी मधे शिक्षण घेणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांन साठी सत्कार कार्यक्रम पार पडले यात त्यांना शैक्षणिक साहित्य व‌ स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अब्दुल करीम सालार तसेच प्रमुख अतिथी म्हणून एजाज़ भाई मलिक,सैय्यद फारूक, डाॅ.एज़ाज शाह , हाजी बशीर बाबा, नुरोद्दीन शेख, राजेश मिश्रा, रय्यान शेख, दानीश शेख व इतर समाज सेवक उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सालार यांनी आज च्या काळात शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.तसेत शिक्षण घेणाऱ्यांना मदती चा हात देणार्यांचे कौतुक हि केले. तर एजाज़ मलिक यांनी म.न.पा शाळां मधे भौतिक सुविधा कशी घेता येईल या विषयी माहिती दिली. मुश्ताक भिस्ती यांनी कार्यक्रम चे उद्दिष्ट स्पष्ट केले सूत्रसंचालन शेख तबरेज़ यांनी केले तर यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष मो.ज़िया बागबान, मोहसीन खान, नईम शेख, फिरोज शेख कारगिल, नईम काझी, एनोद्दीन शेख, अस्लम खाटीक, पप्पू भिस्ती यांनी परिश्रम घेतले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close