
जळगावात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाआरोग्य शिबीर संपन्न; शिबीराचा शेकडो रूग्णांना मिळाला लाभ
जळगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख (ओ.एस.डी) मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव जिल्ह्यांच्या वतीने आज दि. ७-८-२०२२ रविवार रोजी शहरातील देशपांडे हॉस्पिटल येथे एकदिवसीय महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराला तज्ञ डॉ. सांतानू कुमार साहू यांच्याकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन रुग्णांना करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे, जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, भावेश ढाके, राजेंद्र सपकाळे आदींची उपस्थिती होती.
या महाआरोग्य शिबीरात पुढील आजाराने ग्रस्त रूग्णांची मोफत तपासणी, मार्गदर्शन व उपचार करण्यात आले, त्यात छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, शुगर कमी-जास्त होणे, थायरॉईड, विषबाधा उपचार, पोटाचे रोग, क्षयरोग, रक्ताची कमी, माईग्रेन, झोप न लागणे, निमोनिया, दमा, स्वाईन फ्लू, स्त्रियांचे आजार तसेच कोविड नंतर होणारे दुष्परिणाम जसे श्वास घेण्यास त्रास, शुगर वाढणे, हात पाय दुखणे स्मरण शक्ती कमी होणे, हात पायाला जळजळ होणे, वारंवार डोकेदुखी, आदींसारख्या आजारांवर तपासणी व मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आले. या-सह ई.सी.जी, शुगर, रक्तदाब यासह सामान्य चाचण्या शिबीरात मोफत करण्यात आल्या
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबीराच्या यशस्वितेसाठी आरोग्यसेवक अख्तर अली सय्यद, वसीम शेख, रफिक शेख, आकिब शेख, राहुल जावळे, संदिप पाटील, वैद्यकीय मदत कक्ष जळगाव ग्रामिण तालुका समन्वयक भुषण पाटील, अम्मार शेख, शहर समन्वयक विशाल परदेशी, सह-समन्वयक दिपक पाटील, रोशन ठाकरे, ग्रामिण समन्वयक सागर सोनवणे, सह-समन्वयक अनिल पवार यांसह वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयक, आरोग्यसेवकांनी महाआरोग्य शिबीर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.