विभागस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा ,१४ वर्षातील गटात बांस देवळाली विजयी तर सेंट झेविर नाशिक उप विजयी

जळगाव __नाशिक विभागीय स्तरावरील आंतर शालेय १४ वर्षा आतील मुलांच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरुवात झाली असून मंगळवारी या स्पर्धेचे उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एल पी देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांची उपस्थिती होती.

*पारितोषिक वितरण समारंभ*

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सरवनकर मुंबई, फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

*विजयी, उपविजय संघ व खेळाडूंना पारितोषिके*

या स्पर्धेतील विजयी व उपविजेते संघास चषक तसेच संघातील खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक देऊन स्पोर्ट्स हाऊस जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे गौरविण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विजयी, उप विजयी व तृतीय संघास प्रमाणपत्र देण्यात आले.

*स्पर्धेतील पंच*
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्वात निखिल पाटील,सुरज सपके,अमेय तळेगावकर,हर्षद शेख,कौशल पवार, वसीम शेख,सनी कोळी,मनीष कोळी अल्तमस खान,नीरज पाटील,कुलदीप पाटील यांनी पंचाची कार्य उत्कृष्टरित्या पार पडली.

स्पर्धेचा निकाल
१)बान्स स्कूल नाशिक देवलाली विजयविरुद्ध सेंट जोसेफ जळगाव ७-०
२) सेंट झेवियर नासिक स्कूल विजय विरुद्ध हस्ती पब्लिक स्कूल धुले
४-३ पेनल्टी
३) लॉर्ड गणेशा स्कूल जळगाव विजयविरुद्ध एस ए मिशन नंदुरबार स्कूल १-०
४) नॉट पॉईंट धुले विजयविरुद्ध लिटिल एंजल्स मालेगाव २-१
उपांत्य फेरी चे सामने
५) बांस स्कूल नाशिक विजयी विरुद्ध लॉर्ड गणेशा जळगाव ९-०
६) सेंट झेवियर नासिक स्कूल विजयविरुद्ध नॉर्थ पॉइंट धुले स्कूल २-०
७) तृतीय जागेसाठी सामना
लॉर्ड गणेशा स्कूल जळगाव विजय विरुद्ध नॉर्थ पॉइंट स्कूल धुळे १-०

अंतिम सामना
बांस इस्कुल नाशिक विजयविरुद्ध सेंट जेविर स्कूल नाशिक ११-०

फोटो कॅप्शन विजय व उपविजयी संघासोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून सर्वश्री एम के पाटील,मिलिंद दीक्षित,संदीप गावित,फारूक शेख,संदीप सरणकर, अब्दुल मोहसिन आदी दिसत आहे.

–——————————–
*प्रमुख अतिथींना तिरंगा भेट*
*उदघाटन व पारितोषिक वितरण समारंभातील प्रमुख अतिथी प्रो डॉ एल पी देशमुख, होम डी वाय एस पी संदीप गावित यांना फुटबॉल संघटने चे सचिव फारूक शेख यांनी तिरंगा सुपूर्द केला व हर घर तिरंगा चा प्रचार व प्रसार केला*
———————————–

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close