प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान व श्री पापाभाई बिवाल यांचा गुणवंत कलावंत पुरस्काराने गौरव

राहुरी _अहमदनगर येथील ओम गार्डन येथे बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्याच्या नगर शाखेच्या वतीने शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करीत असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालक तथा विद्यार्थी कल्याण संचालक,गीतकार,कवी ,संगीतकार ,गायक,वादक असलेल्या प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान यांचा गुणवंत कलावंत म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या तथा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंके ढोबळे यांच्या हस्ते व अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त गुणवंत पुरस्कार देऊन सन्मान केला.त्याचबरोबर राहुरी येथील दि गोल्डन म्युझीकल नाईटचे समन्वयक व अॅक्टोपॅड वादक कलावंत पापाभाई बिवाल यांनाही गुणवंत कलावंत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले .याप्रसंगी दोघांच्या पुरस्काराची घोषणा राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व परिषदेचे कार्यकर्ते साठेसरांनी केली.यामुळे प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान व  पापाभाई बिवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close