
कोरोना काळात गरिबांवर निःशुल्क इलाज करायला पाहिजे –डॉ.रोहिदास भोई
मुशरब शेख,नाशिक
कोरोना महामारी च्या धाकाने लागलेल्या लॉकडाऊन मुळे गरिबांचे जगणे असह्य झाले आहे.गरीब,मजूरांना एक वेळेस चे जेवण सुद्धा मिळेनासे झाले आहे.अशातच अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि समाजसेवक रस्त्यावर उतरल्याने अनेकांना दिलासा मिळाला.काहींनी घरी जाऊन,काहींनी रस्त्यावर तर काहींनी झोपडपट्टी भागात जाऊन किराणा किट,जेवण आणि अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंचे वितरण केले.नाशिक शहरातल्या वडाळागांव भागात असाच एक वैध्यकिय सेवक दिसला.डॉ.रोहिदास भोई नामक ह्या समाजसेवकाने आपल्या दवाखान्यात संपूर्ण कोरोना काळात निःशुल्कपणे रुग्नांची सेवा केली.सकाळ पासून ते रात्री उशिरा पर्यंत भोई यांनी दररोज १०० ते १५० रुग्नांवर इलाज करून त्यांना गोळ्या,औषधी हि उपलब्ध करून दिल्या.कोरोना काळात हि अनेक दवाखान्यामध्ये पैशांसाठी रुग्णांची साधी तपासणीही करण्यात आली नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत.अशातच डॉ.रोहिदास भोई हे करत असलेल्या सेवेची समाजाने आणि सरकारी यंत्रणेने आवर्जून दखल घ्यायलाच पाहिजे.आमच्या नाशिकच्या प्रतिनिधी ने भोई यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले कि कोरोना काळात गरिबांची निःशुल्क सेवा केलीच पाहिजे.आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेने वैध्यकीय क्षेत्रातल्या सर्वांनी आपल्या परीने समाजसेवेत स्वतःला झोकून द्यायलाच पाहिजे.