
के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये ”जागतिक हा धुवा दिवस” व “वाचन प्रेरणा दिवस” संपन्न.
जळगाव _येथील अंजुमने खिदमते खल्क संचलित के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व डॉ. शाहीन काझी़ ज्युनिअर कॉलेज मध्ये “जागतिक हात धुवा” व “वाचन प्रेरणा दिवस” मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आले. आपल्या
अध्यक्षीय भाषणात त्यांनी हात धुण्या व साफ सफाई चे महत्त्व सांगुन सार्वजनिक स्वच्छता कशी ठेवायची या बाबत माहिती देतांना वाचन प्रेरणा दिना निमित्त वाचनाने व्यक्ती कसा महान बनतो हे हि स्पष्ट करून वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहनही केले. यावेळी विद्यार्थिनींनी विविध पुस्तकासंबंधी विचार व्यक्तकरुन गीतं ही सादर केले. सदर कार्यक्रमात शाळेतील उप शिक्षक तबरेज शेख यांना एशिया एक्सप्रेस उर्दू वृत्तपत्र तर्फे आदर्श शिक्षक सन्मान मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.ह्याच बरोबर “अल्फेज़ फौंडेशन” तर्फे आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.या वेळी शिक्षकवृंद मजरुद्दीन शेख, जमिनीला शेख,व मुशताक भिस्ती यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाचे मजरुद्दीन शेख. जमिनीला शेख, नाज़िया शेख , ग्रंथालय सेविका तहेमीना शेख यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मझरोद्दीन शेख यांनी केले.