वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनी आरोग्य सेवकांचा वैद्यकीय सेवा पुरस्काराने मेळाव्यात सन्मान व पदाधिकार्यांच्या नियुक्त्या

 

जळगाव प्रतिनीधी : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, जळगाव जिल्हा आयोजित उत्तर महाराष्ट्र आरोग्य सेवकांचा विभागीय संवाद मेळावा व वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी ला.ना. विद्यालयातील गंधे सभागृहात मोठ्या जल्लोष व थाटामाटात पार पडला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे, आमदार लता सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांसह श्याम कोगटा, नगरसेवक गणेश सोनवणे, दिनेश जगताप, वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे जितेंद्र गवळी, डॉ. मोईज देशपांडे, डॉ. विकास पाटील, भावेश ढाके, राजेंद्र सपकाळे, दिपक घ्यार, विशाल परदेशी, दिपक पाटील, सागर सोनवणे, विशाल निकम, आदिंची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज, स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमात मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाकडून राज्यभरातस सुरू असलेली सेवेची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदशन केले, तसेच आरोग्यसेवक प्रकाश सपकाळ, यश जैन, सागर विसपुते, अयाज माहसीन, विवेक महाजन, नीलेश गायकवाड, अब्दुल कादर अब्दुल सत्तार कच्छी, सलमा पठाण, अनीस शाह, रागीब शेख, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. विपिन खडसे, डॉ. चंदनकर, मोहन हटकर, स्वप्नील पाटील, प्रदीप सोनवणे, फिरोज पिंजारी, डॉ. निखिल चौधरी, डॉ. भरत गायकवाड, विशाल गाढवे, डॉ. मिनाज पटेल, डॉ. विशाल शिंदे, डॉ. साहु, पराग सरोदे , गजानन चौधरी, उमेश पाटील, प्रदीप चंदन, धनंजय सोनवणे आदिंचा मान्वरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यानंतर वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे जळगाव व धुळे जिल्हा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली ती पुढील पुढील प्रमाणे, पुजा परदेशी यांची जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख अंजली सपकाळे, महानगर प्रमुख पदि किरण चंदन, शहर प्रमुख पदी वर्षा अजय मोघे, शितल फतरोड, तालुका प्रमुख माया पवार, चोपडा तालुका प्रमुख पदी रुखमाबाई सोनवणे, यांसह वैद्यकीय मदत कक्ष मिडीया जळगाव जिल्हा प्रमुख पदी भावेश ढाके, उपजिल्हा प्रमुख म्हणून विशाल निकम तसेच जळगाव ग्रामिण प्रमुख पदि उमेश कोळी, जळगाव उपतालुका प्रमुख म्हणून विजय गवळी, सजन राठोड, सतिश सोनवणे यांची विभाग प्रमुख पदी व जिल्ह्यातील आरोग्यसेवकांच्या नियुक्त्या सोहळ्यात करण्यात आल्या. या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले, तर आभार जितेंद्र गवळी यांनी मानले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close